विश्वचषक जिंकल्यानंतर टीम इंडिया मालामाल; द. अफ्रिकेलाही कोट्यवधी रुपये, कोणाला किती मिळाले?
विश्वचषक जिंकल्यानंतर टीम इंडिया मालामाल; द. अफ्रिकेलाही कोट्यवधी रुपये, कोणाला किती मिळाले?
T20 World Cup 2024 Team India Prize Money: भारतीय संघाने टी-20 विश्वचषक स्पर्धेतील 17 वर्षांचा जेतेपदाचा दुष्काळ अखेर संपवला. सूर्यकुमार यादवचा अखेरच्या षटकातील झेल आणि जसप्रीत बुमराहच्या भेदक गोलंदाजीसह भारत टी-20 2024 विश्वचषकाचा चॅम्पियन ठरला. 2013 नंतर टीम इंडियाने पहिली आयसीसी ट्रॉफी उंचावताना दक्षिण आफ्रिकेला फायनलमध्ये पराभूत केले.
रोमांचक झालेल्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण अफ्रिकेला 7 धावांनी नमवले आणि दुसऱ्यांदा टी-20 विश्वविजेतेपदावर नाव कोरले. प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकात 7 बाद 176 धावांची मजल मारली. यानंतर दक्षिण अफ्रिकेला भारताने 20 षटकात 8 बाद 169 धावांवर रोखले. निर्णयाक क्षणी अर्धशतक झळकवणार विराट कोहली सामनावीर ठरला, तर जसप्रीत बुमराहला मालिकावीरचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. जेतेपद पटकवल्यानंतर भारतीय संघाला कोट्यवधी रुपयांचे बक्षीस मिळाले. भारतीय संघासोबतच दक्षिण आफ्रिकेलाही बक्षीस मिळाले आहे. टी-20 विश्वचषकाच्या स्पर्धेसाठी एकूण बक्षीस रक्कम 11.25 दशलक्ष डॉलर्स (93.51 कोटी) ठेवण्यात आले होते. जेतेपद पटकावणाऱ्या भारतीय संघाला 20.36 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम देण्यात आली. तर दक्षिण आफ्रिकेने 1.28 मिलियन डॉलर्स म्हणजेच 10.64 कोटी कमावले.
उपांत्य फेरीत पोहोचलेल्या संघांनाही मोठं बक्षीस
टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका सोबतच आणखी दोन संघ उपांत्य फेरीत पोहोचले होते. इंग्लंड आणि अफगाणिस्तानने उपांत्य फेरीत धडक मारली होती. मात्र, या दोन्ही संघांना पराभवाचा सामना करावा लागला. इंग्लंड आणि अफगाणिस्तानला बक्षीस म्हणून 6.54 कोटी रुपये मिळाले आहेत. याशिवाय इतर संघांनाही बक्षीस मिळाले आहे. स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत पोहोचलेल्या प्रत्येक संघाला म्हणजेच सुपर 8 ला 3.17 कोटी रुपये मिळाले आहेत.
शेवटच्या स्थानावर असलेल्या संघही मालामाल-
टी-20 विश्वचषक 2024 मध्ये शेवटच्या स्थानावर असलेल्या संघालाही बक्षीस रक्कम मिळाली आहे. यामध्ये 9व्या ते 12व्या क्रमांकावर असलेल्या संघांना 2.05 कोटी रुपये मिळाले आहेत. तर 13व्या ते 20व्या क्रमांकावर असलेल्या संघांना 1.87 कोटी रुपये मिळाले आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या फेरीतील विजयासाठी 25.89 लाख रुपये मिळाले आहेत. सुपर 8 च्या ग्रुप 1 च्या पॉइंट टेबलवर नजर टाकली तर टीम इंडिया येथे अव्वल स्थानावर होती. तर अफगाणिस्तान संघ दुसऱ्या स्थानावर आहे. तर गट 2 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा संघ अव्वल स्थानावर होता. तर इंग्लंड संघ दुसऱ्या क्रमांकावर होता.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 4 SEPT TO...
- 10 September, 2025
ADHARSH SWARAJ 28 AUG TO...
- 03 September, 2025
ADHARSH SWARAJ 21 AUG TO...
- 27 August, 2025
ADHARSH SWARAJ 14 AUG TO...
- 20 August, 2025
ADHARSH SWARAJ 7 AUG TO...
- 13 August, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya