कष्ठकऱ्यांचा जीवनस्तर उंचावण्यासाठी सरकार आर्थिक मदतीची योजना जाहीर करणार! मंत्री हसन मुश्रीफ यांचे रा.मि.म.संघ शिष्टमंडळाला आश्वासन!
मुंबई (: महाराष्ट्रातील असंघटित कामगारांना राज्य सरकार लवकरच आर्थिक मदतीची योजना जाहीर करून त्यांचा जीवनस्तर उंचाविणार आहे ,असे आश्वासन राज्याचे कामगारमंत्री हसनमुश्रीफ यांनी राष्ट्रीय मिल मजदूर संघ शिष्टमंडळाशी बोलताना येथे दिले. शिष्टमंडळाने सोमवारी त्यांच्या सरकारी निवासस्थानी भेट घेतली.
राज्यात हातावर पोट घेऊन जगणाऱ्या असंघटित कामगारांची संख्या ११ कोटवर गेली असून वर्षोनुवर्षे सामाजिक सुरक्षितते पासून वंचित असलेल्या या घटकाला राज्य शासनाने कायमस्वरूपी सामाजिक सुरक्षितेचे बळ प्राप्त करुन द्यावे,अशी मागणी करणारे एक निवेदन राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीने मंत्री महोदयांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे,या हातावर पोट असणाऱ्या कष्ठ कऱ्यांमध्ये घरेलू कामगार, शेतमजूर,उसतोड,नाका कामगार,टँक्सी, रिक्षा,फेरीवाले, बांधकाम मजुर इत्यादीचा समावेश होतो.हा लाखोंच्या घरातील असंटित कामगार देशाच्या अर्थ करणाचा पाया आहे, हे सत्य नाकारता येणार नाही! तेव्हा उतारवयातील या कामगारांना सामाजिक सुरक्षितेचा कायदा नाही किवा अपघात झाल्यावर मदतीचे आर्थिक सहाय्य नाही. राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी लॉकडाऊन काळात भाजी-फळ विक्रेते,रिक्षा,टँक्सी चालकांना आर्थिक मदतीचा हात देऊन देशात महाराष्ट्राचे नाव उंचाविले आहे. तेव्हा आता कायमस्वरूपी भविष्य कालीन योजना आखून
त्यांचा जीवनस्तर उंचावावा, अशी मागणी शिष्टमंडळाने मंत्री महोदयांकडे केली. शिष्टमंडळात खजिनदार निवृत्ती देसाई,उपाध्यक्ष रघुनाथ (अण्णा) शिर्सेकर,सुनिल बोरकर,आंबेकर श्रमसंशोधन संस्थेचे संचालक जी.बी.गावडे होते. त्यावेळी सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांचे निवेदन कामगारमंत्री हसनमुश्रीफ यांनी स्वीकारतांना वरील प्रमाणे आश्वासन दिले.
सामान्य गरीब कष्टकरी कामगारांच्या जीवनात आशेचे किरण निर्माण करणाऱ्या कामगारमंत्री हसनमुश्रीफ यांच्या घोषणेचे राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष माजीराज्यमंत्री सचिन अहिर यांनी स्वागत केले आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 4 SEPT TO...
- 10 September, 2025
ADHARSH SWARAJ 28 AUG TO...
- 03 September, 2025
ADHARSH SWARAJ 21 AUG TO...
- 27 August, 2025
ADHARSH SWARAJ 14 AUG TO...
- 20 August, 2025
ADHARSH SWARAJ 7 AUG TO...
- 13 August, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya