अंड खाण्याची पद्धत-फायदे
- by
- Aug 14, 2021
- 1038 views
अंडी प्रोटीनचा एक मोठा स्रोत आहे. त्यामुळे आरोग्यासाठी फायेदशीर असलेल्या पदार्थांमध्ये अंड्याला महत्व आहे. अंड्यांमध्ये कॅलरीज, प्रोटीन, गुड कोलेस्ट्रॉल,फॉलेट, कॅल्शियम, फॉस्फरस, सेलेनियम, व्हिटॅमीन ए, व्हिटॅमीन बी5, व्हिटॅमीन बी6, व्हिटॅमीन बी 12, व्हिटॅमीन बी, व्हिटॅमीन के हे पोषक घटक असतात. त्यामुळेच जगभरातले कित्येक लोक अंडी आवडीने खातात. दररोज 1 अंडं खाणं आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानलं जातं. अंड खाल्ल्याने वजन वाढत नाही. शिवाय आपलं आरोग्यही निरोगी राहतं. इम्युनिटी वाढवण्यासाठी अंड खाणं फायदेशीर मानलं जातं. अंड हा प्रोटीनचा एक चांगला स्रोत आहे. याशिवाय यामध्ये व्हिटॅमीन इ देखील असतं. जिममध्ये वर्कआउट करणारे लोक उकडलेली अंडी खातात. पाहुयात उकडलेले अंडं खाण्याचे फायदे.
- डोळ्यांसाठी फायदा
उकडलेला अंड आपल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगलं आहे. यामध्ये ग्लूटन नावाचा घटक असतो. शिवाय चांगल्या त्वचेसाठी देखील उकडलेलं अंडं खावं. संशोधनानुसार पुरुषांमध्ये शुक्राणूंची कॉलिटी सुधारण्यासाठी अंड फायदेशीर आहे. - कोलेस्ट्रॉल बॅलेन्स
अंड्यामध्ये फोस्फेटाइट्स आणि ओमेगा 3 फॅटी ऍसिड असतं. जे शरीरामधल्या बॅड कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण करतं. आपण ऑम्लेट खातो तेव्हा, त्यासाठी वापरलेल्या तेलामुळे शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल वाढतो. म्हणूनच सकाळच्या वेळी उकडलेलं अंड खाणं फायदेशीर ठरतं. - प्रोटीनचा स्त्रोत
दिवसभर उत्साही राहण्यासाठी अंडं खायला हवं. अंड्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन असतं. जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं. - मेंदूसाठी उत्तम
अंड्यामध्ये कोलाइन नावाचं एन्जाइम असतं. स्मृतीभ्रंश याचा त्रास असणार्या लोकांसाठी हे फायदेशीर आहे. ज्यांना हा असा त्रास आहे त्यांनी दररोज 1 उकडलेलं अंड सकाळच्या नाश्त्यामध्ये खाल्ल्यास त्यांच्या शरीरात कोलाइनची कमतरता दूर होऊन मेंदू तल्लख होतो.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 4 SEPT TO...
- 10 September, 2025
ADHARSH SWARAJ 28 AUG TO...
- 03 September, 2025
ADHARSH SWARAJ 21 AUG TO...
- 27 August, 2025
ADHARSH SWARAJ 14 AUG TO...
- 20 August, 2025
ADHARSH SWARAJ 7 AUG TO...
- 13 August, 2025
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya