आतातरी हा ‘डेंजर’ विषय मनावर घ्या
पांडवकड्यावर न येण्याचे पोलीसांचे आवाहन
पनवेल ः दरवर्षी पांडवकडा परिसरात हजारो पर्यटक येत असतात. मात्र अनेकांना अतिउत्साहामुळे पाण्याचा अंदाज न आल्याने आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे या परिसरात 3-4 वर्षांपासून पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. यंदा तर कोव्हिड काळ असल्याने कडक बंदी असूनही अनेकजण पोलीसांची नजर चुकवून पांडवकडा परिसरात पोहचतात. त्यामुळे मागील काही वर्षांत येथे मृत्यू झालेल्या पर्यंटकांची यादी प्रसिद्ध करून, त्यावर पांडवकड्याचा फोटो असून,‘डेंजर’असे लिहून पांडवकड्यावर येऊन आपला जीव धोक्यात घालू नका, असे आवाहन पोलीसांनी पर्यटकांना केले आहे. त्याबरोबर पांडवकड्याचा फोटो असून,‘डेंजर’ असे लिहून पर्यटकांच्या मनात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न चर्चेचा विषय ठरला आहे.
सात दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसात खारघरच्या पांडवकडा परिसरात 150 हून अधिक पर्यटक धोकादायक ठिकाणी अडकले होते. सिडकोच्या अग्निशमन दलाने या पर्यंटकांना सुखरूपपणे बाहेर काढले. या घटनेमुळे खारघर पोलिसांची अनेक पर्यटक पोलिसांची नजर चुकवून पांडवकडा आणि परिसरातील धबधब्यांवर जाऊन धोका पत्करीत असल्याचे समोर आले. वारंवार आवाहन करून, मुख्य प्रवेशद्वारावर फलक लावूनही पर्यटक येथे वीकेंड साजरा करण्यासाठी जात आहेत. त्यामुळे खारघर पोलिसांनी मागील दोन-तीन वर्षांत पांडवकडा परिसरात पर्यंटनासाठी गेलेल्या मृतांची यादी प्रसिद्ध केली आहे. ही यादी समाजमाध्यमांवर व्हायरल करून पर्यटकांच्या मनात या निमित्ताने तरी भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. 16 मृतांच्या यादीत पुढे कोणाचे नाव असेल याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करून, वरीलपैकी कुणालाही मरायचे नव्हते, ते पावसाळी पर्यटनासाठीच आले होते. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने मयत झाले आहेत. प्रत्येकाने स्वत:ची काळजी स्वत:च घ्यायला हवी, असे म्हटले आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 4 SEPT TO...
- 10 September, 2025
ADHARSH SWARAJ 28 AUG TO...
- 03 September, 2025
ADHARSH SWARAJ 21 AUG TO...
- 27 August, 2025
ADHARSH SWARAJ 14 AUG TO...
- 20 August, 2025
ADHARSH SWARAJ 7 AUG TO...
- 13 August, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya