‘अवघे गर्जे पंढरपूर’ भक्तांसाठी अनुपम सोहळा
19 हजार 709 भक्तांनी घेतला लाभ
पनवेल ः गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे लाखो भक्तांची वारी होऊ शकली नाही. मात्र असे असले तरी महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक पंडित उमेश चौधरी व तालमणी पंडित प्रतापराज पाटील या दोन दिग्गज कलाकारांनी ‘अवघे गर्जे पंढरपूर’ या धार्मिक कार्यक्रमाच्या सादरीकरणातून विठूमाऊलीचा गजर करून भक्तीचा अनुपम सोहळा पनवेलकरांसाठी घडवून आणला.
आषाढी एकादशी या दिवशी संपूर्ण आसमंत विठूनामाच्या गजराने दुमदुमतो आणि भक्तीचा दरवळ पसरतो. आषाढी वारीनिमित्त लाखो वारकरी पंढरपूरात पोहचतात. पण यंदाही कोरोनाचे सावट आणि राज्य सरकारने दिलेल्या निर्बंधामुळे लाखो वारकऱयांना वारीला मुकावे लागले आहे. परंतु विठूभक्तांची हिरमोड होऊ नये, तसेच भक्तमंडळींना भजन, आरती व दर्शनाचा लाभ व्हावा म्हणून माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, भजनसम्राट निवृत्तीबुवा चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवार, दि. 20 रोजी स्थानिक टेलिव्हिजन वाहिनी व इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून खारघर रांजणपाडा येथून थेट प्रक्षेपण करण्यात आले होते.
या सोहळ्यात पंडित उमेश चौधरी यांना पखवाज साथ पंडित प्रतापराज पाटील यांनी, तबला साथ कुणाल पाटील, गायनसाथ मंगेश चौधरी व अक्षय चौधरी, तर सुप्रिया जोशी यांनी संवादिनीची साथ दिली. तसेच या भक्तीमय कार्यक्रमाचे सुत्रसंचालन उस्ताद अजीम खान यांनी करून त्यांनी आपल्या सूत्रसंचालनातून संगीतामधून वारीचे महत्व भाविकांसमोर मांडले. वारी हि वारकर्यांची साधना आहे. गेल्या दोन वर्षांत कोरोना महामारीमुळे या साधनेत व्यत्यय निर्माण झाला असला तरी ‘पंढरीची वारी आहे माझ्या घरी’ या उक्तीप्रमाणे वारकर्यांचा निश्चय कायम आहे. दुःखनाश, संतसंगती, पारलौकिक सुख आणि धर्म या चार गोष्टींसाठी वारी महत्वाची मानली जाते. त्यामुळे ‘चुकलिया माय ख बाळ हुरहुरा पाहे ख ख तैसे झाले माझ्या जीवाख केव्हा भेटशी केशवाख ख’ अशी परिस्थिती असली तरी थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून झालेल्या या वारी दर्शन अनुपम सोहळ्याचा 19 हजार 709 भक्तांनी लाभ घेतला.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 4 SEPT TO...
- 10 September, 2025
ADHARSH SWARAJ 28 AUG TO...
- 03 September, 2025
ADHARSH SWARAJ 21 AUG TO...
- 27 August, 2025
ADHARSH SWARAJ 14 AUG TO...
- 20 August, 2025
ADHARSH SWARAJ 7 AUG TO...
- 13 August, 2025
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
सेलिब्रिटी बर्थडे
Malaika Arora
- जन्मदिन
- October 23
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya