उपजिल्हा रुग्णालयातील त्रुटी दूर करा, मनुष्यबळ वाढवा
खा. श्रीरंग बारणे यांची रुग्णालय प्रशासनाला सूचना
पनवेल ः पनवेल उपजिल्हा रुग्णालयात 200 बेड असून सर्व सोयी सुविधा असलेले हॉस्पिटल आहे. कोरोना रुग्णांसह इतर रुग्णावर देखील उपचार केले जातात. अनेक कोरोना रुग्ण येथे उपचार घेऊन ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्णालयात मनुष्यबळ वाढवावे. डॉक्टर, औषधे उपलब्ध करून देण्याच्या सूचना शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी संबंधित विभागाच्या अधिकार्यांना दिल्या. तसेच रुग्णालयातील त्रुटी तत्काळ दूर करण्याचा सूचनाही त्यांनी रुग्णालय प्रशासनाला दिल्या.
पनवेल उपजिल्हा रूग्णालयाला खासदार श्रीरंग बारणे यांनी सोमवारी भेट दिली. रुग्णांची विचारपूस करुन रूग्णालयातील कोरोना वार्ड व इतर पेशंटची सविस्तर माहिती घेतली. वैद्यकीय अधिक्षक डॉ. बसवराज लोहारे, डॉ. बालाजी फाळके, डॉ. अरुण पोहरे, सुभाष जाधव, ज्योती गुरव, शिवसेना जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील, पनवेल शहर संघटक प्रविण जाधव,कामोठे शहर प्रमुख राकेश गोवारी,जिल्हा परिषद सदस्य मोतीराम ठोंबरे यावेळी उपस्थित होते. पनवेल उपजिल्हा रुग्णालयात 200 बेड आहेत. सर्व सोयी सुविधा असलेले हॉस्पिटल आहे. कोरोना रुग्णांसह इतर रुग्णावर देखील उपचार केले जातात. व्हेंटिलेटर, आयसीयू, ऑक्सिजनची कमतरता भासू देऊ नका, रूग्णांना चांगली सेवा द्यावी. जिल्ह्यातील चांगल्या प्रकारचे रुग्णालय आहे. अनेक रुग्ण येथे उपचार घेऊन ठणठणीत बरे होऊन घरी गेले असल्याचे सांगून खासदार बारणे म्हणाले, सद्यस्थितीत उपचार घेत असलेल्या रुग्णांची माहिती घेतली. ज्या त्रुटी आहेत त्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्या. त्या तत्काळ सोडवण्याच्या सूचना दिल्या आहेत. डॉक्टर, नर्स, सर्व स्टाफ उत्तम काम करत आहे. कर्मचार्यांवर ताण येत आहे. मनुष्यबळाची कमतरता आहे. याबाबत तत्काळ संबंधित विभागाच्या अधिकार्यांना फोन करून डॉक्टर, औषधे उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या असून लवकरच अधिकचे मनुष्यबळ उपलब्ध होईल. त्यामुळे कोरोना विरोधातील लढाईला आणखी बळ मिळेल असेही त्यांनी सांगितले.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 4 SEPT TO...
- 10 September, 2025
ADHARSH SWARAJ 28 AUG TO...
- 03 September, 2025
ADHARSH SWARAJ 21 AUG TO...
- 27 August, 2025
ADHARSH SWARAJ 14 AUG TO...
- 20 August, 2025
ADHARSH SWARAJ 7 AUG TO...
- 13 August, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya