आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चमकल्या पनवेलच्या ‘नृत्यआराधना’
पनवेल ः अखिल नटराजम आंतर सांस्कृतिक संघ नागपूर, मेंबर ऑफ थे इंटरनॅशनल डान्स कौन्सिल सीआयडी पॅरिस-फ्रांस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘वर्ल्ड डान्सर ऑनलाईन इंटरनॅशनल डान्स कॉन्टेस्ट 2021’ या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पनवेल येथील नृत्यआराधना कला निकेतन संस्थेच्या विद्यार्थिनींनी तसेच त्यांच्या प्रशिक्षकांनी नेत्रदिपक कामगिरी करून सुवर्णयश संपादन केले आहे. यामुळे संस्थेच्या आणि पनवेलच्या शिरपेचात आणखी मानाचा तुरा खोवला गेला आहे. या यशाबद्दल माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी विजेत्यांचे व प्रशिक्षकांचे अभिनंदन आणि कौतुक केले. सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
ऑनलाईन पद्धतीने झालेल्या या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, साऊथ आफ्रिका, कॅनडा, जर्मनी, ओमान, युएई, सिंगापूर, मलेशिया, कतार, एकोडोर आदी देशातील 460 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्यामधील 306 स्पर्धकांची अंतिम फेरीसाठी निवड झाली होती. भरतनाट्यम, कथक, ओडिसी, कुचिपुडी, मोहिनी अट्टम, सेमी क्लासिकल, इंडियन फोक, बॉलिवूड, हिपहॉप आणि कंटेम्पररी आदी नृत्य प्रकारांचा समावेश होता.या स्पर्धेत नृत्यआराधना कला निकेतन पनवेल संस्थेच्या संचालिका व प्रशिक्षक गुरु अँड. दीपिका मनीष सराफ आणि अमिता सचिन सराफ यांच्या मार्गदर्शनाखाली या नृत्य संस्थेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत पनवेलमधील नृत्यआराधना कला निकेतन संस्थेने ‘समूह भरतनाट्यम सिनिअर गटात’ प्रथम क्रमांक, ‘भरतनाट्यम जोडी सिनिअर गटात’ प्रथम क्रमांक, ‘सेमी क्लासिकल लहान गटात’ तृतीय क्रमांक , ‘ट्राओ सेमी क्लासिकल खुल्या गटात’ तृतीय क्रमांक, ‘सेमी क्लासिकल समूह लहान गटात’ द्वितीय क्रमांक पटकाविले तसेच प्रशिक्षक गुरु दिपीका सराफ यांनी बेस्ट कोरिओग्राफर पुरस्कारही जिंकत सुवर्णयश व अभिमानास्पद कामगिरी केली. नृत्यआराधना कला निकेतनच्यावतीने या स्पर्धेत ‘समूह भरतनाट्यम सिनिअर गटात’ प्रणिता वाघमारे, सई जोशी, वैखरी पोटे, श्रावणी थळे, नित्या पाटील, अवनी पवार, ‘भरतनाट्यम जोडी सिनिअर गटात’ तनया घरत आणि कोमल पाटील, ’सेमी क्लासिकल एकेरी लहान गटात’ ओवी नायकल, ट्राओ सेमी क्लासिकल खुल्या गटात’ वैशाली पवार, निलम बोरडे, गौरी सातपुते, तर ‘सेमी क्लासिकल समूह लहान गटात’ ज्वेता सराफ, ऋतुजा पावसकर, मेह्क जोशी, ओवी नायकल, देवश्री झावरे, अदिती शेंडे, तन्वी पाटील, हर्षिता कुलकर्णी, मान्या दास यांनी सहभाग घेऊनपारितोषिके पटकाविली. या यशाबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून आणि नागरिकांडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 4 SEPT TO...
- 10 September, 2025
ADHARSH SWARAJ 28 AUG TO...
- 03 September, 2025
ADHARSH SWARAJ 21 AUG TO...
- 27 August, 2025
ADHARSH SWARAJ 14 AUG TO...
- 20 August, 2025
ADHARSH SWARAJ 7 AUG TO...
- 13 August, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya