स्थायी समितीची सभा तहकूब
मालमत्ता करावरून विरोधी पक्षनेते आक्रमक
पनवेल : 22 मार्च रोजीच्या पनवेल महापालिकेच्या सभेतून मालमत्ता करवाढीवरून महाविकास आघाडीचे सदस्य आक्रमक झाले होते. यावेळी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी आक्रमक भूमिका घेत ही सभा तहकूब करायला लावली. आधी मालमत्ता कराबाबत निर्णय घ्या, नंतर सभा घ्या असे प्रितम म्हात्रे यांनी ठणकावून सांगितल्याने स्थायी समितीची सभा तहकूब करायला लावली.
पनवेल महागरपालिका आणि सत्ताधार्यांनी मालमत्ता करात वाढ केली आहे. वाढवलेल्या कराबाबत जनतेच्या मनात प्रचंड रोष आहे. या करवाढीला महाविकास आघाडीच्या सदस्यांचा ठाम विरोध आहे. पनवेल महापालिका हद्दीत नवीन कोणताही कर लावू नये अशी महाविकास आघाडीची ठाम भूमिका आहे. 22 मार्च रोजी आयोजित करण्यात आलेल्या सर्वसाधारण सभेत जाऊन विरोधी पक्षाने (महाविकास आघाडी) दरवाढीविरोधात निदर्शने केली होती. यावेळी मालमत्ता करा संदर्भात विशेष सभा लावा, अन्यथा कोणत्याही सभेला उपस्थित राहणार नाही अशी भूमिका घेण्यात आली होती. 22 मार्च रोजीच्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेदरम्यान पत्रकारांना वार्तांकन करण्यास मनाई करण्यात आली होती. त्यांना सन्मानाने पुन्हा बोलावण्यात यावे अशी मागणी पनवेल महापालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी केली आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 4 SEPT TO...
- 10 September, 2025
ADHARSH SWARAJ 28 AUG TO...
- 03 September, 2025
ADHARSH SWARAJ 21 AUG TO...
- 27 August, 2025
ADHARSH SWARAJ 14 AUG TO...
- 20 August, 2025
ADHARSH SWARAJ 7 AUG TO...
- 13 August, 2025
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
सेलिब्रिटी बर्थडे
Malaika Arora
- जन्मदिन
- October 23
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya