पनवेल मनपा कंत्राटी कर्मचारी महासंघाची कार्यकारणी जाहीर
पनवेल ः नव्याने निर्मित झालेल्या पनवेल महानगरपालिकेमध्ये महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी महासंघाची कार्यकारणी जाहीर करण्यात असल्याची माहिती महासंघाचे अध्यक्ष मुकुंद जाधवर यांनी दिली आहे. तर कंत्राटी कर्मचार्यांना कायम समायोजनासाठी सर्वोतपरी प्रयत्न करणार असल्याचे मत महासंघाचे मंत्रालयीन सचिव शाहरुख मुलाणी यांनी व्यक्त केले आहे.
पनवेल महानगरपालिका कंत्राटी कर्मचारी महासंघाची बैठक नुकतीच घेण्यात आली होती. याबैठकीत महानगरपालिकेतील कंत्राटी कर्मचार्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या. यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत असलेल्या कर्मचार्यांना 60 टक्के केंद्र सरकारचे व 40 टक्के राज्य सरकारचे असे एकूण 100 टक्के मानधन दिले जाते. पण, ते मानधन वेळेवर मिळत नसल्याचे निदर्शनास आले व त्यातील फार देखील अध्याप आरोग्य कर्मचार्यांना मिळाले नसल्याचे कळाले. तसेच वेतन वाढ, सुट्ट्या आदी विषयांवर चर्चा झाली. त्याचबरोबर गेली अनेक वर्षांपासून येथील कर्मचारी याच ठिकाणी काम करत असून त्यांना कायम समायोजन करण्याचे कोणतीही हालचाल नसल्याचे देखील निदर्शानास आणून देण्यात आले. त्यावर मुलाणी म्हणाले की, महासंघ कर्मचार्यांच्या पाठीशी असून न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सर्वोतपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. तसेच वेळ आल्यास आंदोलन देखील उभारू असे अध्यक्ष मुकुंद जाधवर म्हणाले. दरम्यान पनवेल मनपा मधील सर्व कंत्राटी कर्मचारी यांनी महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी महासंघाचे प्राथमिक सदस्यत्व स्वीकारले. याप्रसंगी महासंघाच्या पनवेल मनपा क्षेत्राच्या अध्यक्ष पदी डॉ. पद्मिनी येवले, कार्याध्यक्ष पदी डॉ. रेहना मुजावर यांची तर सचिवपदी भारती पवार यांची निवड करण्यात आली. त्यांना नियुक्ती पत्र देऊन त्यांच्या सत्कार करताना महासंघाचे अध्यक्ष मुकुंद जाधवर व महासंघाचे मंत्रालयीन सचिव पदी शाहरुख मुलाणी हे उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 4 SEPT TO...
- 10 September, 2025
ADHARSH SWARAJ 28 AUG TO...
- 03 September, 2025
ADHARSH SWARAJ 21 AUG TO...
- 27 August, 2025
ADHARSH SWARAJ 14 AUG TO...
- 20 August, 2025
ADHARSH SWARAJ 7 AUG TO...
- 13 August, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya