राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धा
- by
- Dec 30, 2020
- 1007 views
पनवेल : श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व स्वायत्त दर्जाप्राप्त चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने यंदा जानेवारी 2021मध्ये सातवी अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
नाट्य चळवळ वृद्धिंगत करण्यासाठी व नाट्यरसिकांना आपले नाट्याविष्कार प्रदर्शित करता यावे, त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे तसेच देशाच्या विकासासाठी सदैव धडपडणारे भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या विचारांचा वारसा अविरतपणे पुढे चालत रहावा यासाठी माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापालिका सभागृह नेते व नाट्य परिषद पनवेल शाखा उपाध्यक्ष परेश ठाकूर यांनी अटल करंडक एकांकिका या दर्जेदार स्पर्धेचा प्रारंभ केला.
नामवंत, उमदे आणि हौशी कलावंत या स्पर्धेकडे नेहमीच आकर्षित होतात. स्पर्धेचे देखणे व नेटके संयोजन, आकर्षक पारितोषिके, दर्जेदार परीक्षण आणि सर्वोत्तम स्पर्धास्थळ यामुळे ही स्पर्धा नाट्यरसिकांच्या गळ्यातील ताईत बनली. दरवर्षी ही स्पर्धा डिसेंबर महिन्यात होत होती, पण यंदा कोरोनामुळे ती जानेवारीमध्ये कोरोनासंदर्भात शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करून होणार आहे.
स्पर्धेची प्राथमिक फेरी 16 व 17 जानेवारी रोजी पिंपरी-चिंचवड (पुणे) येथे आणि 22 ते 24 जानेवारीला खांदा कॉलनीतील सीकेटी महाविद्यालय येथे होणार असून, अंतिम फेरी 29, 30 व 31 जानेवारी रोजी पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात रंगणार आहे.
अशी आहेत पारितोषिके
प्रथम क्रमांक-एक लाख रुपये आणि मानाचा अटल करंडक, द्वितीय क्रमांक-50 हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांक-25 हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, चतुर्थ क्रमांक-10 हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह तसेच सर्वोत्कष्ट दिग्दर्शक, अभिनेता, अभिनेत्री, लेखक, संगीत, नेपथ्य, प्रकाश योजना, उत्तेजनार्थ अशी विविध पारितोषिके देण्यात येणार आहेत.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 4 SEPT TO...
- 10 September, 2025
ADHARSH SWARAJ 28 AUG TO...
- 03 September, 2025
ADHARSH SWARAJ 21 AUG TO...
- 27 August, 2025
ADHARSH SWARAJ 14 AUG TO...
- 20 August, 2025
ADHARSH SWARAJ 7 AUG TO...
- 13 August, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya